मुंबई:-अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी दहा हजार कोटीचे अर्थसाह् केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट केले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. राज्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे 55 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेती क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफ निकषाची वाट न पाहता दहा हजार कोटी चे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे.
हे हि वाचा:-भारतीय खाद्य महामंडळ यांच्या आस्थापनेवरील वॉचमन पदाच्या 860 जागा