आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विम्याची रक्कम

crop insurance

मुंबई:- सन 2020 चे पिक विम्याची रक्कम येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे अभिवचन पिक विमा कंपनीने मंगळवारी झालेल्या बैठकीत कृषिमंत्री व लोकप्रतिनिधी यांच्या चर्चेदरम्यान दिले.

पिक विमा कंपनी याबाबत वेळकाढूपणा करत असल्याचे शासन व लोकप्रतिनिधी यांच्या लक्षात आले होते.यापूर्वी एक सप्टेंबर रोजी कृषिमंत्री सोबत बैठक झाली होती परंतु त्यावर तोडगा निघाला नव्हता. जोपर्यंत राज्य शासन त्यांच्याकडे असलेले पीक विम्याची थकीत रक्कम जमा करत नाही तोपर्यंत पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना सन 2020 चा पिक विमा वितरीत करणार नाही अशी भूमिका पिक विमा कंपनीने घेतली होती.त्या वेळी आमदार संजय कुटे यांनी जर 15 सप्टेंबरपर्यंत पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात सन 2020 पिक विम्याची रक्कम जमा केली नाही तर 16 सप्टेंबर रोजीपिरोजी विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले जाईल असे जाहीर केले होते.

दरम्यान 16 सप्टेंबरला आमदार संजय कुटे यांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन केले असता कृषी विभागाचे अधिकारी 15 दिवसाची मुदत वाढवून मागितली होती. त्यानुसार मंगळवारी दि. पाच ऑक्टोबर रोजी कृषी मंत्री नामदार दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव जिल्ह्यातील आमदार यांच्या उपस्थितीत पिक विमा प्रतिनिधींची बैठक झाली. त्यामध्ये पिक विमा कंपनीने आपले नकारघंटा कायम ठेवल्याने पुन्हा पेच निर्माण झाला होता.

हे हि वाचा:-पिक विमा कंपन्यांना 12 हजार कोटी चा या हंगामात नफा विमा योजनेचा फक्त तामिळनाडूला लाभ

संजय कुठे झाले आक्रमक

जोपर्यंत पिक विमा कंपनी शेतकऱ्याचा सन 2020 चा पिक विमा त्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा करीत नाही तोपर्यंत त्यांना या बैठकीतून जाऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका आमदार संजय कुटे यांनी मंगळवारच्या बैठकीत घेतली.त्याला कृषी मंत्री नामदार दादाजी भुसे व खासदार प्रतापराव जाधव यांनी पाठिंबा दिला परिणामी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी वरिष्ठांशी चर्चा करून येत्या आठ दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल हे मान्य केले त्यामुळे सात आठ महिन्यांपासून प्रलंबित असणारा हा प्रश्न आखिर मिटला.

कंपनीचे वेळकाढू धोरणामुळे शेतकरी अडचणीत

गेल्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती परंतु पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा दिला नव्हता.यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे आणि पीक विमा कंपनी मदत करण्याच्या ऐवजी पंचनामे करण्याचा फार्स शेतकर्या सोबत  खेळत आहे.सध्या शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.त्यामुळे पीक विमा कंपनी लवकरात लवकर आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *