लेमन ग्रास ची शेती करा आणि पानापासून 5 वर्ष उत्पन्न कमवा

लेमन ग्रास हे एक विशेष असे पीक आहे. याचा चहा औषधी असून आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे. याची मागणी शहरात अधिक आहे. महाविद्यालयीन युवक-युवती असो किंवा कोणत्या आयटी कंपनीत काम करणाऱ्या इंजिनियर सर्वांना दुधाच्या ऐवजी लेमन चहा प्रिय झाला आहे. या चहा मुळे कोणताही त्रास होत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मन की बात कार्यक्रमात लेमन ग्रास शेतीच कौतुक केलं आहे.लेमनग्रास एक औषधी वनस्पती आहे याचा वापर औषध,कॉस्मेटिक आणि डिटर्जंट मध्ये केला जातो. लेमन ग्रास ची शेती करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकत.

lemongrass-sixteen_nine
lemongrass

चार महिन्यात लेमन ग्रास तयार होतो.

लेमन ग्रास चार महिन्यांमध्ये तयार होतो. लेमन ग्रासने तेल बनवले जातात आणि बाजारात त्याला चांगला भाव मिळतो.बाजारात याची मागणी खूप वाढली आहे.लेमन ग्रास शेती करताना नाही खताची गरज असते नाही जनावरे शेतीला नुकसान पोहोचण्याची भीती असते त्यामुळे ही शेती फायद्याची आहे.लेमन ग्रास एकदा पेरले कि पाच ते सहा वर्षांपर्यंत चालतो. याला पेरण्याचा योग्य काळ हा फेब्रुवारी ते जुलै दरम्यान असतो.एकदा पेरल्यानंतर सहा ते सात वेळा याची कापणी केली जाते. एकदा वर्षात तीन ते चार वेळा याची कापणी केली जाते.याचं तेल काढलं जातं. एका वर्षात एका एकरातून तीन ते पाच लिटर तेल निघतं याचे एक लिटर तेलाची किंमत अंदाजे एक हजार ते पंधराशे रुपये आहे.

हे हि वाचा:-एक शेतकरी एक डीपी योजनेस मुदतवाढ.

कापणी:-एकदा लागवडीनंतर दोन वर्षापर्यंत गवती चहाचे उत्पादन सुरू राहतो. लागवडीनंतर 2.5 ते तीन महिन्यांनी पहिली कापणी.त्यानंतर दर दोन महिन्यांनी चहाची कापणी केली जाते. खराब पान बाजूला काढून चांगले पानाचे पेंढ्या बांधल्या जातात. त्याचे वजन केले जातात आणि ही पान पोत्यात भरून विक्रीसाठी पाठवली जातात.

  • 20 गुंठ्यांतून तेराशे ते पंधराशे म्हणजेच साडेसहा ते सात क्विंटल पानाचे उत्पादन मिळते.
  • ज्याला बाजारात सरासरी 30 रुपये किलो असा दर मिळतो.
  • यातून दोन लाख दहा हजाराचा उत्पन्न त्यांना मिळतं.
  • मजुरी वाहतूक खत असा 75 हजाराचा खर्च वजा जाता निव्वळ नफा एक लाख 35 हजाराचा राहू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *