सौर ऊर्जेवर वीज निर्मिती करा आणि विका शेतकऱ्यांसाठी पाच ऑक्‍टोबरपर्यंत निविदा भरण्याची संधी

Solar Rooftop

अपारंपरिक ऊर्जा निर्मिती वाढून शेतकरी आणि शेती संस्था साठी संधी देणाऱ्या या योजनेत महावितरणने 487 मेगावॅट साठी निविदा जाहीर केल्या आहेत. निविदा भरण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे.या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन लाभ घ्यावा,असे आवाहन महावितरणने केले आहे.

बीड:-केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कुसुम योजने अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाला गती देण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत सोलार पॅनल साठी 5 ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांना निविदा भरता येतील अशी माहिती महावितरण तर्फे देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेत, शेतकऱ्यांनी नापीक आणि अकृषीक जमिनीचा वापर वीजनिर्मितीसाठी करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात?

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत तयार झालेली वीज महावितरणला विकता येणार आहे. शेतकऱ्यांना नापीक जमीन आणि सौर प्रकल्पासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा पर्याय खुला करण्यात आला आहे.0.5 ते दोन मेगावॉट क्षमतेचे विकेंद्री कृत सौर ऊर्जा प्रकल्प प्राधान्याने शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था, आणि पाणी वापर करते संघटना सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करू शकतात. जमिनीवरील सौर प्रकल्पाची उभारणी स्टील्ट रचने द्वारे ही करता येईल.त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा वापर भाडे पट्टी व्यतिरिक्त पिकाच्या लागवडीसाठी करता येईल.

हे हि वाचा:-या झाडाच्या लाकडाची एक किलो ची किंमत अंदाजे २० हजार रुपये बघा ते कुठले झाड आहे.

काय आहे प्रधानमंत्री कुसुम योजना

नापीक आणि कृषक जमिनींचा वापर करून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री योजना (घटक अ)केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे सौर ऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महावितरणला विकून किंवा सौर प्रकल्पासाठी जमीन भाडे पट्टीवर देऊन उत्पन्न मिळवणेची संधी शेतकऱ्यांना दिली जात आहे. भविष्याच्या दृष्टीने आत्ताच वीज निर्मितीचे नवे स्रोत बळकट करण्यासाठी महावितरणने योजना व्यापक केली आहे.

पाच ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांना संधी

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत निविदेद्वारे भाग घेण्याकरता आर्थिक निकष नाहीत, मात्र विकासकाला योजनेअंतर्गत भाग घेण्याकरिता काही अटी आहेत. यात बयाणा रक्कम एक लाख रुपये,मेगावाट परफॉर्मन्स बँक गॅरंटी पाच लाख रुपये, मेगावॅट उद्देशीय पत्र जारी केल्या पासून 12 महिन्याच्या आत प्रकल्प कार्यान्वित करणे बंधनकारक आहे. तसेच वीज खरेदी करार प्रकल्प कार्यान्वित झालेल्या तारखेपासून 25 वर्षासाठी 3.10 प्रतियुनिट दराने राहणार आहे. अपारंपारिक ऊर्जा निर्मिती वाढवून शेतकरी आणि शेती संस्था साठी संधी देणाऱ्या या योजनेत महावितरणने 487 मेगावॅट साठी निविदा जाहीर केल्या आहेत.निविदा भरण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

कुसुं सौर पंप योजना 2021 ला 14 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. https://www.mahaurja.com/meda/en/node या लिंक वर क्लिक करून इच्छुकास अर्ज करता येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *