लातूर:-जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी पाच लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे सध्या शेतकरी संकटात असताना बँकेच्या वतीने घेण्यात आलेला हा निर्णय नक्कीच दिलासादायक आहे यासंदर्भात लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी बँकेचे अभिनंदन केले.
हे वाचा:-उत्तर भारतात कापसाला मिळतोय 6000 ते 7000 रुपये दर.

या संदर्भात आमदार धीरज देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की,शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणणाऱ्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी बांधवांना पीक कर्जासाठी पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.