
हिंगोली:- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धन्य बाजारात ( भुसार मार्केट) यंदाच्या (2021) हंगामातील नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे गुरुवारी तारीख 9 मुहूर्ताच्या सोयाबीनला कामाला 11021 रुपये दर मिळाले,अशी माहिती बाजार समितीचे सचिव नारायणराव पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात यंदाच्या हंगामात दोन लाख 57 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी केलेल्या तसेच लवकर काढणीस येणाऱ्या जी एस 9305 सोयाबीनची आवक सुरू झाली आहे.गुरुवारी तारीख 9 एकांबा तालुका हिंगोली येथील शेतकऱ्याची तीन क्विंटल सोयाबीन ला जाहीर लिलावात प्रतिक्विंटल 11021 रुपये दर मिळाला.
दरम्यान हिंगोली बाजार समिती गुरुवारी तारीख दोन सोयाबीनची 55 क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान 8000ते कमाल नऊ हजार रुपये तर सरासरी आठ हजार पाचशे रुपये दर मिळाले शनिवारी तारीख चार 18 क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान 8800ते कमल 9105 रुपये तर सरासरी आठ हजार 952 रुपये दर मिळाले.