या तारखेला येणार जाहिरात राज्यात तलाठय़ांच्या जागा मोठय़ाप्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठय़ांची भरती करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत दिली. सदरच्या पदासाठी जाहिरात हि एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शकता आहे.