या शेतकर्यांना मिळणार 1400 कोटी मदत राज्यात गेल्या काही महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या पण मदतीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही विशेष बाब म्हणून सुमारे १४०० कोटींची मदत देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून त्याबाबत लवकरच निर्णय होईल. तसेच पुढील खरीप हंगामापासून मदतीच्या निकषामध्ये बदल करून तीन दिवसांत १०० मिलिमीटर पाऊस होऊन झालेल्या नुूकसानीचीही शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.