mahesh babu new movie:सध्या महेश बाबूचे प्रमुख भूमिका असलेल्या ‘गुंटूर कारम’ या चित्रपटाचे जोरदार चर्चा रंगली आहे
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता म्हणून महेश बाबूचं नाव घेतलं जातं. चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या महेश बूची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गुंटूर कारम’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील ‘कुर्ची मदातापेट्टी’ गाण्याची पहिली झलक समोर आली आहे. यात महेश बाबू आणि अभिनेत्री श्री लीलाचा जबरदस्त स्वॅग पाहायला मिळतोय. गाण्याची फक्त एक झलकच सगळ्यांचे होश उडवत आहेत.mahesh babu new movie
‘कुर्ची मदातापेट्टी’ सगळ्यांचे होश उडवणार

पहा व्हिडिओ
श्री लीला हिने या गाण्याचा टीझर तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. टीझरमध्ये महेश बाबू आणि श्री लीलाचा दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. गाण्याच्या फक्त टीझरनेच चाहत्यांना वेड लावलं आहे. हे गाणे ‘पुष्पा’मधील ‘ओ अंटावा’ गाण्याला टक्कर देणार असल्याचं चाहते म्हणत आहेत. ‘कुर्ची मदातापेट्टी हे गाणे 30 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.mahesh babu new movie
Gold Silver Rate 2024:आनंदाची बातमी! नवीन वर्षात सोनं चांदी झालं स्वस्त, पहा आजचा भाव
महेश बाबूचा ‘गुंटूर कारम’चित्रपट त्रिविक्रम यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात महेश बाबूशिवाय जगपती बाबू, प्रकाश राज आणि रम्या कृष्णन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 13 जानेवारी 2024 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश बाबू सध्या न्यू इयर सेलिब्रेशनसाठी अमेरिकेत असून लवकरच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभागी होणार आहे.