हे हि वाचा:-ग्रामपंचायत अंतर्गत MREGS ची कामे पहा घरबसल्या मोबाईलवर
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना 6/4/2 दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करतांना 50 टक्के तर, अनुसूचित जाती/ जमातीच्या लाभार्थीना 75 टक्के शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित 50 टक्के रक्कम तसेच, अनुसूचित जाती/ जमातीच्या लाभार्थ्यांना अनुदान व्यतिरिक्त उर्वरित 25 टक्के रक्कम स्वत: अथवा बँक/ वित्तीय संस्थेकडून कर्ज रुपाने उभारावी लागेल.
लाभार्थी निवड व पात्रता
सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच अनुसूचित जाती/ जमातीच्या लाभार्थ्यांची निवड खालील घटकांवरून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात यावी.
खालीलप्रमाणे लाभार्थी व पात्रता दिलेली आहे.
महिला बचत गटातील लाभार्थी
अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्यंतचे भूधारक)
सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
साधारणपणे गाय म्हशी गट वाटप योजनेची लाभार्थी निवड पात्रता दिलेली आहे. (Gai Mhashi Gat Vatap Yojana Maharashtra)
Gai Mhashi Vatap योजनेचा लाभ
या योजनेअंतर्गत सहा संकरित गाई/ म्हशींच्या एका गटाची किंमत रुपये 3,35,184 रुपये इतकी निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे:-
अ.क्र. —- बाब —- किंमत रुपये
—- सहा संकरित गाई/ म्हशींचा गट प्रति गाय/ म्हैस रु. 40,000/- प्रमाणे —- 2,40,000/-
—- जनावरांसाठी गोठा —- 30,000/-
—- स्वयंचलित चारा कटाई यंत्र —- 25,000/-
—- खाद्य साठविण्यासाठी शेड —- 25,000/-
—- 5.75 टक्के (+10.03% सेवाकर) दराने तीन वर्षांचा विमा —- 15,184/-
एकूण:- 3.35,184/- रुपये
निवड प्रक्रिया व अर्ज
गाय/ म्हैस विमा 2022:-
गाय म्हैस अनुदान योजनेअंतर्गत 3 वर्षाचा विमा यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
लाभार्थी निवड प्रकिया:-
लाभार्थी निवड प्रक्रिया ही लाभार्थी निवड समिती व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत होईल
योजनेचा अर्ज सादर कुठे करावा?
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावयाचा आहे. ‘Gai Mhashi Vatap Yojana Maharashtra’