10 वी-12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या वेळेसंदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय

Maharashtra Board Exam Maharashtra Board Exam

Maharashtra Board Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी इयत्ता बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या दरम्यान होणार आहे. दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या काळात घेतली जाणार आहे.

Maharashtra Board Exam 2023-24: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही परीक्षांसाठी 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एखाद्या पेपरसाठी 3 तासांचा वेळ देण्यात येत असेल तर यंदा हा वेळ 3 तास 10 मिनिटांचा असणार आहे.

pm kisan status 2024:PM किसान योजनेचा १६वा हप्ता “या” तारखेला बँक खात्यात जमा होणार

10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ कशासाठी? Maharashtra Board Exam

यापूर्वीही बोर्डाच्या परीक्षांमध्ये 10 अतिरिक्त मिनिटं ही निर्धारित वेळेच्या आधी वाढवून दिली जायची. म्हणजे 11 चा पेपर असेल तर 10.50 पासून तो सुरु व्हायचा. प्रश्नपत्रिकेचं आकलन करण्यासाठी हा वेळ वाढवून दिला जात होता. मात्र अनेक कॉपी प्रकरणं समोर येण्याचं प्रमाण हे चिंताजनक होतं. अनेकदा पेपर फुटल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. त्यामुळेच आता बोर्डाने मागील वर्षाप्रमाणे यंदाही पेपरचा कालावधी संपल्यानंतर निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटं अधिक वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्धा तास आधी पोहचा

मात्र परिक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावं लागेल, अशा सूचना बोर्डाने दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करुनच त्यांना परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे वेळेआधी विद्यार्थ्यांनी केंद्रावर पोहचावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

परीक्षा कधी होणार?

बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातच जाहीर करण्यात आल्या आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या काळात घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणार आहे.

प्रॅक्टीकल परीक्षा कधी होणार?

दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 ते गुरुवार, दिनांक 29 फेब्रुवारी 2024 आणि 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी ते मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *