Jio Unlimited 5G Data Plan : JIO चा नवा अनलिमिटेड 5 जी डेटा प्लॅन लाँच; 84 दिवसांच्या डेटा कॉलिंगसह Sony LIV, Zee5 चं फ्री सब्सक्रिप्शन

Jio Unlimited 5G Data Plan

Jio Unlimited 5G Data Plan : रिलायन्स जिओने 909 रुपयांचा (Jio unlimited 5G data plan) नवा प्री-पेड प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन 5G डेटासह येतो. तसेच ओटीटी अॅप्सचे  (Reliance Jio) सब्सक्रिप्शन मिळते. जिओने 909 रुपयांचा अनलिमिटेड डेटा प्लॅन लाँच केला आहे. ट्रायच्यावतीने जिओ आणि एअरटेलला अनलिमिटेड डेटाच्या अटी आणि शर्ती स्पष्टपणे सांगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशावेळी अनलिमिटेड 5G डेटा म्हणजे 30 दिवसांसाठी जास्तीत जास्त 300 जीबी डेटा मिळणार आहे.

PM-KISAN Yojana 2023 : ‘या’ दिवशी जमा होणार 16 वा हप्ता; 16 व्या हफ्त्यापासून जमा होणार तब्बल 12 हजार रुपये

Jio unlimited 5G data plan : 909 रुपयांच्या प्लॅनचे फायदे

जिओच्या 909 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची Validity 84 दिवसांची आहे. म्हणजेच तुम्हाला 84 दिवसांसाठी दररोज जास्तीत जास्त 2 GB डेटा दिला जाईल. तसेच दररोज 100 SMS दिले जातील. या प्लानमध्ये तुम्हाला सोनी लिव्ह, ZEE 5 आणि जिओ टीव्हीचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाणार आहे. याशिवाय जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडवर अॅक्सेस दिला जाणार आहे.

5G data plan : 5G रिचार्ज प्लॅन लवकरच लाँच होणार

जिओने वर्षभरापूर्वी 5G नेटवर्क रोलआउट केले आहे. देशातील अनेक ठिकाणी 5G सेवा उपलब्ध आहे. सध्या जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांकडून मोफत 5Gडेटा दिला जात आहे. यासाठी किमान 249 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. रिपोर्टनुसार, जिओ आणि एअरटेलकडून लवकरच 5G रिचार्ज प्लॅन लाँच केले जाऊ शकतात. मात्र जिओ आणि एअरटेलकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

रिलायन्स जिओचा 299 रुपयांचा प्लॅन

299 रुपयांच्या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सना 2 GB डेटा प्रमाणे एकूण 56 GB डेटा मिळतो. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर, वेग 64Kbps पर्यंत कमी होतो. या पॅकमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉल्सची सुविधा मिळते आणि प्लॅनमध्ये 100 मोफत एसएमएस देण्यात येत आहेत. जिओच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

रिलायन्स जिओचा 395 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

395 रुपयांचा प्लॅन अशा ग्राहकांसाठी आहे जे दीर्घ वैधता योजना शोधत आहेत. जिओच्या 395 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधता मिळते. ग्राहकांना एकूण 6GB डेटा मिळेल. तसेच, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि 1,000 एसएमएस मोफत उपलब्ध असतील. तुमच्‍या डेटा प्‍लॅनच्‍या मर्यादेपर्यंत पोहोचल्‍यानंतर, वेग कमी होऊन 64Kbps होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *