PM Kisan | “या” दिवशी खात्यात पुन्हा येईल पीएम किसान योजनेचा पैसा, ही आहे तारीख

PM Kisan

PM Kisan | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड दौऱ्यावर असताना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan) हप्ता जमा केला. देशभरातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपये जमा झाले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ईकेवायसी ही प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

Farmers SBI Bank Loan:शेतकऱ्याचे “या” बँकेत खाते असेल तर मिळणार 2लाख रुपये, फक्त दोन दिवसात खात्यात जमा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनाचा हप्ता जमा केला. पंतप्रधान झारखंड दौऱ्यावर होते. त्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपये जमा केले. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना e-kyc पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनेक शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने या योजनेतून बाहेर फेकले गेले आहेत. आता या योजनेचा 16 वा हप्ता या दिवशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.PM Kisan

कसा मिळतो फायदा

ऑक्टोबर 2022 मध्ये 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता जमा करण्यात आला. यापूर्वी केंद्र सरकारने या 27 जुलै रोजी 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. आता नोव्हेंबर महिन्यात केंद्राने 15 वा हप्ता जमा केला होता. म्हणजे प्रत्येक हप्त्यात जवळपास पाच महिन्यांचे अंतर असल्याचे दिसून येते. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये जमा केले. यापूर्वी DBT माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली.

मग 16 वा हप्ता कधी होणार जमा?

या योजनेनुसार प्रत्येक चार महिन्यात दोन हजारांची रक्कम जमा होते. 15 वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा झाला होता. त्यानुसार, 16 वा हप्ता फेब्रुवारी ते मार्च या काळात जमा होण्याची शक्यता आहे. अजून याविषयीचा खुलासा केंद्र सरकारने केला नाही. हा हप्ता या कालावधीत जमा होऊ शकतो. या वर्षातील तीन ही हप्ता जमा करण्यात आलेले आहे.

असे करा ई-केवायसी

जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ekyc न केल्यास 16 वा हप्ता थांबविण्यात येईल. त्यासाठी तुम्हाला हे काम त्वरीत करावे लागेल. त्यासाठी पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन ते अपडेट करावे लागेल. तसेच CSC केंद्रावर जाऊन ही माहिती अपडेट करता येईल. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास योजनेचा हप्ता जमा होणार नाही.

या शेतकऱ्यांना नाही मिळत लाभ

ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील वा सेवानिवृत्त असतील त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. 10 हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना या योजनेचा फायदा मिळत नाही. इनकम टॅक्स जमा करणाऱ्यांना या योजनेच्या बाहेर ठेवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *