PM Kisan 15th Installment Date : पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपये असे वार्षिक 6,000 रुपये मिळतात. हे पैसे दरवर्षी एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये दिले जातात.
RBI BANK Minimum balance rule:1 नोव्हेंबर पासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार, RBI ने मिनिमम बॅलन्सबाबत नवा नियम केला जाहीर ?
लाभार्थी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 15 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जारी केला जाण्याची शक्यता आहे. या वर्षी जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 वा हप्ता जारी करण्यात आला. पीएम किसान अंतर्गत 14 वा हप्ता जुलै 2023 मध्ये 13 वा हप्ता जारी झाल्यानंतर 5 महिन्यांनी आला. ऑक्टोबर 2022 मध्ये 12 वा हप्ता आला होता. तर 11वा टप्पा मे 2022 मध्ये जमा करण्यात आला होता.
पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपये असे वार्षिक 6,000 रुपये मिळतात. हे पैसे दरवर्षी एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात. सरकारने आतापर्यंत एकूण 2.50 लाख कोटी रुपये पीएम-किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना हस्तांतरित केले आहेत. ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती.
नाव लाभार्थी यादीत आहे की नाही ते तपासा. PM Kisan 15th Installment Date
– सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तुम्ही थेट https://pmkisan.gov.in/ या लिंकवर जाऊ शकता.
– यानंतर, होम वर दिसणार्या Know Your Status च्या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला नोंदणी क्रमांक विचारला जाईल.
– तुम्हाला नोंदणी क्रमांक माहित नसेल तर तुमचा नोंदणी क्रमांक जाणून घ्या. पर्यायावर क्लिक करा. मोबाईल नंबर एंटर करा आणि नंतर कॅप्चा टाका.
– यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी मिळेल. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक कळेल.
– नंतर Know Your Status वर क्लिक करा आणि नंतर नोंदणी क्रमांक टाकून तुमची स्थिती तपासा.
-. तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेत तुमचे नाव पाहायचे असेल किंवा तुमच्या संपूर्ण गावातील लोकांची नावे पाहायची असतील तर तुम्हाला https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल.
– तुम्हाला उजव्या बाजूला दिसणार्या लाभार्थी यादीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या यादीवर क्लिक केल्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
– यानंतर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणाऱ्या गावातील सर्व लोकांची नावे दिसतील.