Headlines

bharti:सरकारी नोकरी, जागा जास्त उमेदवार कमी,जागा 4800 अर्ज आले फक्त 4 हजार, भरती प्रक्रियेत पेच

bharti

bharti:एखाद्या भरतीसाठी जाहिरात निघाल्यावर अर्ज करणाऱ्यांचा पाऊस पडतो. अगदी शिपाईची जागा असताना पीएचडी उमेदवार अर्ज करत असल्याचे स्पष्ट झाले. परंतु आता उलट प्रक्रिया झाली आहे. जागा जास्त अन् उमेदवार कमी…

Old Land Record 2023:1880 पासून गावातील कोणत्याही व्यक्तीचा सातबारा, फेरफार पहा तुमच्या मोबाईलवर मोफत घरबसल्या

सरकारी नोकरीच्या जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या हजारो, लाखोंच्या घरात असते. सध्या पोलीस विभागापासून जिल्हा परिषदेपर्यंत अनेक विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेत जागांपेक्षा अनेक पटीने उमेदवारांनी अर्ज केले आहेत. नगरपालिकेच्या जागांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सरकारी नोकरीसाठी मोठी स्पर्धा असताना शिक्षकपदाच्या नोकरीसाठी कमी अर्ज आले आहेत. जागा चार हजार ८०० असताना अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या केवळ चार हजार आहे.

gharkul yojana 2023:आपल्या गावची 2022-2023 ची सर्व योजनांची घरकुल यादी पहा आपल्या मोबाईलवर 

४ हजार ८०० पदे मंजूर

राज्यातील अनुसूचित जमाती क्षेत्रातील शाळेत ४ हजार ८०० पदे रिक्त झाली आहेत. ही पद भरण्यास शासनाने मंजुरी दिली होती. ३ एप्रिल २०२३ रोजी शासन आदेश त्यासाठी काढण्यात आला. मात्र प्राप्त झालेल्या उमेदवारांची छाननी केल्यावर एकूण ४ हजार उमेदवार पात्र ठरले आहे. यामुळे अर्ज कमी आणि जागा जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिक्षण विभागाकडून १३ जिल्ह्यांत पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यात अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.bharti

स्थानिक उमेदवारांची निवड

या परीक्षेच्या अनुषंगाने एसटी-पेसामधील उमेदवारच पात्र ठरतात. अर्ज केलेल्या उमेदवारांची सेवाज्येष्ठतेप्रमाणे मेरिट लिस्ट तयार केली जाते. या जागा भरतीसाठी राज्यात २०२२ मध्ये अनुसूचित जमातीमधून टेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमदेवारांची यादीही शिक्षण विभागाने संबंधित जिल्ह्यांना दिली आहे. त्यानंतरही पात्र उमेदवार मिळत नाही.bharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *