PM किसानचा 15 वा हप्ता मिळणापूर्वी करा ‘हे’ काम
अन्यथा लाभापासून राहाल वंचित
ज्या शेतकऱ्यांनी eKYC केले नाही त्यांना यादीतून वगळणार
शेतकऱ्यांना PM किसानचा 14 वा हप्ता मिळाल्यानंतर आता शेतकऱ्यांना 15वा हप्ता कधी मिळणार याची चर्चा सुरु आहे. 15 व्या हप्त्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. कारण शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींच्या पडताळणीदरम्यान अनेक शेतकरी लाभार्थी यादीतून वगळले गेले आहेत. अशा परिस्थितीत लाभार्थींची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी ज्या शेतकऱ्यांनी eKYC केले नाही त्यांना देखील या यादीतून वगळले जाऊ शकते.
या कारणांमुळेही पैसा अडकू शकतो
तुम्ही PM किसान योजनेंतर्गत पात्र असला तरीही तुमचे पैसे मिळणे बंद होऊ शकतात. कारण तुम्ही भरलेल्या अर्जात कोणतीही चूक नसणे अपेक्षीत आहे. त्यामध्ये लिंग, नाव, पत्ता आणि खाते क्रमांकामध्ये काही चूक असल्यास योजनेचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी याची खात्री करणं गरजेचं आहे.PM Kisan Yojana 15th instalment
शेतकऱ्यांनी लवकरात लवकर eKYC करुन घ्यावी
जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी असाल आणि अद्याप ई-केवायसी केली नसेल, तर तुम्ही 15 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकता. अशा स्थितीत तुम्ही लवकरात लवकर eKYC करुन घेणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जावं लागेल किंवा तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊनही ते करून घेऊ शकता.
दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत PM Kisan Yojana 15th instalment
PM किसान सन्मान निधी योजने अंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. हे सहा हजार रुपये प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. आत्तापर्यंत 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 27 जुलैला PM किसानचा 14 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसानचा 14 वा हप्ता जमा करण्यात आला होता.