Headlines

msrtc update:महिलांना अर्ध्या तिकिटावर बस प्रवास निर्णयामध्ये मोठा बदल; आता फक्त “या” वयोगटातील महिलांना मिळणार योजनेचा लाभ

msrtc update

msrtc update:राज्य सरकाने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. एसटी महामंडळाच्या सर्व बसमधून महिलांना अर्ध्या तिकिटावर राज्यात कोठेही प्रवास करता येणार आहे. मात्र, राज्य सरकारने महिलांसाठी  जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी तारीख अद्याप निच्छित झाली नाहीय. दरम्यान, राज्य सरकाने घेतलेला निर्णय हा बससाठी आणि महिलांसाठी योग्य असून तसे परिपत्रक रीतसर आल्यानंतर सर्व महिलांना लाभ देण्यात येईल, अशी माहिती जळगावचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली आहे.msrtc update

महिलांना अर्ध्या तिकिटावर बस प्रवास निर्णयामध्ये मोठा बदल

आता फक्त “या” वयोगटातील महिलांना मिळणार योजनेचा लाभ

pm kisan 15th installment list:पी एम किसान योजना 15 वा हप्ता आला, गावानुसार यादी जाहीर, येथे पहा तुमचे नाव

सध्या दररोज सरासरी ५ लाखापेक्षा जास्त अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक एसटीतून मोफत प्रवास करतात. दरमहा ६५ ते ७० कोटी रुपये मिळतात. सध्या एसटीतून दररोज ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करतात आणि विविध योजनांमुळे महामंडळाला दिवसाला (प्रतिपूर्ती रक्कमेसह) २२ ते २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. त्यातून अडचणीतील लालपरीचा प्रवास सुरू आहे. आता राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार परिपत्रक निघाल्यानंतर महिलांना प्रवास दरात ५० टक्क्यांची सवलत लागू होईल. त्याचाही मोठा आधार लालपरीला मिळणार आहे.msrtc free pass

लालपरीची सद्यःस्थिती
सध्या दररोज सरासरी ५०-५५ लाख प्रवासी करतात लालपरीतून प्रवास., एकूण प्रवाशांमध्ये अंदाजे ३० टक्के म्हणजेच १६ ते १७ लाख महिला प्रवासी., १२ वर्षाखालील मुलींना आणि ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ महिलांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत., राज्यातील ७५ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना प्रवासात १०० टक्के सवलत., महामंडळाचा दरमहा सरासरी खर्च ८५० कोटी व उत्पन्न ७२० कोटींपर्यंत आहे.

नोकरदार व माहेरवासिनींना लालपरीचा आधार msrtc update
एसटीने प्रवास न करणाऱ्या महिला सध्या पर्यायी वाहनांचा वापर करतात. अनेक नोकरदार स्त्रिया स्वतःची दुचाकी अथवा चारचाकी घेऊन ये-जा करतात. काही महिला वडाप, ॲटोरिक्षातून जातात. तर अनेकजण कुटुंबासोबत खासगी वाहनाचा वापर करतात. त्या महिला आता एसटीकडून ५० टक्के सवलत मिळणार असल्याने लालपरीतून प्रवास करतील. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला भरघोस उत्पन्न मिळेल आणि अडचणीतील लालपरीची स्थिती सुधारेल, असा विश्वास महामंडळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *