IBPS Recruitment:आयबीपीएस (IBPS) मार्फत विविध बँकात विविध पदांच्या ८५९४ जागा,पगार 80 हजार, पात्रता पदवी

IBPS Recruitment:नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना तसेच सरकारी नोकरी व इतर महत्त्वाची माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. सर्व शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवने हा आपला उद्देश आहे. तर अशीच माहिती म्हणजे आयबीपीएस (IBPS) मार्फत विविध बँकात विविध पदांच्या ८५९४ जागा,पगार 80 हजार, पात्रता पदवी IBPS Recruitment

जाहिरात पाहण्यासाठी व

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

आयबीपीएस (IBPS) मार्फत विविध बँकात विविध पदांच्या ८५९४ जागा,पगार 80 हजार, पात्रता पदवी भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ८५९४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.IBPS Recruitment

विविध पदांच्या एकूण ८५९४ जागा
प्रोबेशनरी ऑफिसर (स्केल- I, II, III) आणि ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय कर्मचारी) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार खालील प्रमाणे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

बहुउद्देशीय कर्मचारी (ऑफिस असिस्टंट)– उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण आणि स्थानिक भाषेचे ज्ञान तसेच संगणक वापरण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

सहव्यवस्थापक (ऑफिसर  स्केल- I) – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण तसेच कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कृषी विपणन आणि सहकार्य, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र, लेखाकर्म मधून पदवी केलेल्या उमेद्वारांना प्राधान्य असेल आणि स्थानिक भाषेचे ज्ञान तसेच संगणक वापरण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

व्यवस्थापक (बँकिंग ऑफिसर स्केल- II) – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण तसेच बँकिंग, वित्त, विपणन, कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कृषी विपणन आणि सहकार्य, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र आणि लेखाकर्म मधून पदवी केलेल्या उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.

विशेतज्ञ अधिकारी (ऑफिसर स्केल- II) – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन/ संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण किमान ५०% गुणांसह उत्तीर्णसह ASP, PHP, C++, Java, VB, VC, OCP प्रमाण धारण केलेले असणे आवश्यक आहे. तसेच सनदी लेखापाल पदांकरिता भारताचे लेखापाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड कडून सहयोगी (CA) प्रमाणित असावे तसेच कायदा अधिकारी पदांकरिता कायद्यातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समतुल्य पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण, तसेच  ट्रेझरी मॅनेजर पदांकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थामधून चार्टर्ड अकाउंटंट किंवा फायनान्स मध्ये एमबीए केलेले असावे तसेच कृषी अधिकारी पदांकरिता कृषी/ फलोत्पादन/ डेअरी शाखेतून पदवी किंवा पशुसंवर्धन/ वनीकरण/ पशुवैद्यकीय विज्ञान/ कृषी अभियांत्रिकी/ मत्स्यपालन शाखेतून मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ संस्थेतून किमान ५०% गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.IBPS Recruitment

वरिष्ठ व्यवस्थापक (ऑफिसर स्केल- III) – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातुन कोणत्याही शाखेतील पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण  किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच बँकिंग, फायनान्स, मार्केटिंग मध्ये पदवी/डिप्लोमा असणे, कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कृषी पणन आणि सहकार, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र आणि अकाउंटन्सी शाखेतून पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल IBPS Recruitment

परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी ८५०/- रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी १७५/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top