msrtc new rule:एसटी प्रवासात महिलांना 50 टक्के सूट? पण नवीन नियम व अटी काय? आधी जाणून घ्या नाहीतर काढावे लागेल फुल टिकीट

msrtc new rule

msrtc new rule:राज्य सरकाने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. एसटी महामंडळाच्या सर्व बसमधून महिलांना अर्ध्या तिकिटावर राज्यात कोठेही प्रवास करता येणार आहे. मात्र, राज्य सरकारने महिलांसाठी  जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी तारीख अद्याप निच्छित झाली नाहीय. दरम्यान, राज्य सरकाने घेतलेला निर्णय हा बससाठी आणि महिलांसाठी योग्य असून तसे परिपत्रक रीतसर आल्यानंतर सर्व महिलांना लाभ देण्यात येईल, अशी माहिती जळगावचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली आहे.msrtc new rule

नवीन नियम व अटी काय? आधी जाणून घ्या

आता फक्त “या” वयोगटातील महिलांना मिळणार योजनेचा लाभ

लालपरीची सद्यःस्थिती msrtc new rule
सध्या दररोज सरासरी ५०-५५ लाख प्रवासी करतात लालपरीतून प्रवास., एकूण प्रवाशांमध्ये अंदाजे ३० टक्के म्हणजेच १६ ते १७ लाख महिला प्रवासी., १२ वर्षाखालील मुलींना आणि ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ महिलांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत., राज्यातील ७५ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना प्रवासात १०० टक्के सवलत., महामंडळाचा दरमहा सरासरी खर्च ८५० कोटी व उत्पन्न ७२० कोटींपर्यंत आ
हे.msrtc new rule

नोकरदार व माहेरवासिनींना लालपरीचा आधार msrtc update
एसटीने प्रवास न करणाऱ्या महिला सध्या पर्यायी वाहनांचा वापर करतात. अनेक नोकरदार स्त्रिया स्वतःची दुचाकी अथवा चारचाकी घेऊन ये-जा करतात. काही महिला वडाप, ॲटोरिक्षातून जातात. तर अनेकजण कुटुंबासोबत खासगी वाहनाचा वापर करतात. त्या महिला आता एसटीकडून ५० टक्के सवलत मिळणार असल्याने लालपरीतून प्रवास करतील. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला भरघोस उत्पन्न मिळेल आणि अडचणीतील लालपरीची स्थिती सुधारेल, असा विश्वास महामंडळाला आहे.

नवीन नियम व अटी काय? आधी जाणून घ्या

आता फक्त “या” वयोगटातील महिलांना मिळणार योजनेचा लाभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *