हे हि वाचा:Land Record:1880 पासूनचे जुने सातबारे फेरफार पहा मोबाईलवर
सणासुदीच्या काळात कांद्याचा चांगलाच भाव वाढण्याची शक्यता आहे. एका आठवड्यात कांद्याचे दर किलोमागे ५ रुपयांनी वाढले आहेत. मुसळधार पावसामुळे कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे. नवीन कांदा येण्यासाठी साधारण एक ते दीड महिन्याचा अवधी लागेल. काही कांदा हा खराब झाला आहे. कांद्याची वाढणारी मागणी आणि पुरवठा यामध्ये अंतर पडल्याने भाव वाढले आहेत.
दिवाळीआधी केंद्र सरकारचे 3 मोठे निर्णय, तुमच्यावर होणार थेट परिणाम
Onian Price कांद्याचं उत्पादन ६ राज्यांमध्ये होतं. ५० टक्के कांदा हा १० मोठ्या मार्केटमधून येतो, ज्यामध्ये ६ कांद्याच्या मोठ्या बाजारपेठा ह्या महाराष्ट्रात तर उर्वरित कर्नाटकामध्ये आहेत. भारताचे शेजारी असलेला बांग्लादेश आणि श्रीलंका सर्वाधिक कांदा त्यांच्या देशात आयात करतात. भारत मलेशियामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा पाठवला जातो.
आर्थिक वर्ष २०२१-२२ दरम्यान 6.58 लाख टन कांदा भारताकडून खरेदी करण्यात आला होता. एक वर्षापूर्वी ही आकडेवारी ५.५२ होती. बांग्लादेश पाठोपाठ मलेशिया कांदा खरेदीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
कांद्याचे दर वाढले तर हॉटेलपासून अगदी घरापर्यंत अनेक गोष्टींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. लासलगावमध्ये कांद्याचे दर वाढत आहेत. त्यामुळे कांदा खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
हे हि वाचा:Loan waiver:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 964 कोटी रुपये कर्जमाफीची घोषणा
येणाऱ्या दिवसांमध्ये घाऊक बाजारात २२ ते २५ रुपये प्रति किलोग्राम कांदा पोहोचण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात पावसाचा अजूनही धुमाकूळ चालू आहे. त्यामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचा मोठा परिणाम कांदा पिकावर झाला आहे.