बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; उद्या दुपारी लागणार निकाल

hsc result

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra Board) वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result 2022) उद्या, बुधवारी (८ जून रोजी) दुपारी १ वाजता लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडिया आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये विविध दावे केले जात होते. (HSC Result 2022

👉निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

त्यातील काही अहवालांमध्ये बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान बारावीचा निकाल उद्या म्हणजेच बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याचं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे यंदाचा निकाल नेमका कसा लागणार? याकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागून आहे. (12th Result Date)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणेनागपूरऔरंगाबादमुंबईकोल्हापूरअमरावतीनाशिकलातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर बुधवार दिनांक ०८/०६/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

मार्च – एप्रिल २०२२ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

👉निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *