पी एम किसान योजनेसाठी राशन कार्ड सक्तीचे

पुणे:- पी एम किसान योजना ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 रोजी सुरू केलेले आहे. या योजने अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर  सहा हजार रुपये जमा केले जातात. सदरच्या योजनेत कुटुंबा हा घटक गृहीत धरण्यात आलेला होता.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन टप्प्यामध्ये सहा हजार रुपये दोन दोन हजार रुपये प्रमाणे जमा केले जातात.

नवीन नोंदणी करणाऱ्यांना राशन कार्ड सक्तीचे

पी एम किसान योजना अंतर्गत कुटुंबातील एका व्यक्तीला सहा हजार रुपये या योजनेअंतर्गत मिळणार होते. परंतु या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थ्याची नोंदणी करण्यात आलेली आहे असे शासनाच्या निदर्शनास आले. या योजनेअंतर्गत कुटुंबात पती-पत्नी आणि अविवाहित मुलगा या पैकी कुटुंबातील एका व्यक्तीला सदरच्या योजनेचा लाभ मिळणार होता परंतु पती पत्नी आणि काही ठिकाणी मुलगा देखील या योजनेअतर्गत नोंदणी करण्यात आलेली आहे.

त्यामुळे या योजनेअंतर्गत बोगस लाभार्थी शोधून त्यांचा लाभ बंद करण्यासाठी नवीन नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना राशन कार्ड सक्तीचे करण्यात आलेले आहे.

हे हि वाचा -शून्य रुपये गुंतवून आधार कार्ड फ्रॅंचाईजी घ्या;महिन्याला हजारो कमवा

55000 बोगस लाभार्थी

या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थी यांनी नोंदणि केलेली आहे.या बोगस लाभार्थ्यांना शोधून त्यांना या योजनेतून निष्कासित करणे हे शासनाचे ध्येय आहे.या योजने अंतर्गत या वर्षी जवळपास 55 हजार लोकांना बोगस लाभार्थी म्हणून शासनाने जाहीर करून त्यांना या योजनेचा लाभ घेण्यापासून रोखण्यात आले आहे.

बोगस लाभार्थी यांच्याकडून  शासनाने आतापर्यंत दिलेली रक्कम वसूल केली जाणार आहे.

10 वा हप्ता कधी येणार

पी एम किसान योजनेचा 10 वा हप्ता कधी येणार याची वाट शेतकरी पाहत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा दहावा हप्ता 15 डिसेंबर च्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top