पंजाब डक:- या वर्षी मोठ्या प्रमाणावर मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे हातचे पीक देखील गेलेले आहेत. अतिवृष्टीमुळे सोयाबीन,कापूस,तूर या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सध्या महाराष्ट्रातून परतीच्या पावसाने एक्झिट घेतली असली तरी येत्या दिपावळी मध्ये 2,3,4 तारखेला पाऊस येणार आहे असे हवामान तज्ञ पंजाब डक यांनी सांगितले आहे.
हे हि वाचा :-महिनाभरात पिक विमा ची नुकसान भरपाई मिळणार.
2 नोव्हेंबर च्या आधी सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीन,मका, कापूस ,तूर पिकाची काढणी करून घरामध्ये आणून ठेवावे. श्रीलंके पासून 250 किलो मीटर अंतरावर एक चक्रीवादळ तयार होत आहे. त्याचे वादळात रुपांतर होऊन सहा राज्यात पाऊस पडणार आहे.तो पाऊस महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ ,तामिळनाडू या राज्यात दोन तीन चार नोव्हेंबर मध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन मका, कांदा रोप, कापूस, द्राक्ष पिकाची काळजी घ्यावी.
द्राक्ष शेतकरी यांनी सतर्क राहावे.दिनांक 2,3, 4 नोव्हेंबरला पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे द्राक्ष शेतकऱ्याने सतर्क राहून आपल्या द्राक्ष बागेची काळजी घेण्यात यावी.