नवी दिल्ली:- पी एम किसान योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले शेतकऱ्यांसाठी चांगली योजना आहे. योजनेमध्ये प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात. आतापर्यंत या योजने अंतर्गत एकूण नऊ हाफ्ते शेतकऱ्यांना जमा झालेले आहेत. तुम्हाला जर दहाव्या हप्त्याची पैसे पाहिजे असतील तर खालील गोष्टीकडे लक्ष द्यावे अन्यथा पैसे मिळणार नाहीत.
कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे
1. प्रथमता तुमचा पत्ता नीट तपासा. जेणेकरून गावाचे स्पेलिंग लिहिण्याची चूक होणार नाही. या चुका आधार द्वारे दुरुस्त करा.
2. शेतकऱ्याने त्याचे नाव इंग्रजीत लिहिणे आवश्यक आहे.
3. बँकेचा आयएफसी कोड तपासून घेण्यात यावा. वरील प्रकारची खात्री करून घेण्यात यावी अन्यथा आपले पैसे अडकतील.
4. आपला खाते नंबर तपासून घ्या.
हे हि वाचा :-रोज फक्त 50 रुपयांची बचत करून मिळवू शकता 1 कोटी रुपये
55 हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही पी एम किसान योजनेचे पैसे
गेल्या काही काळात काही बोगस शेतकऱ्यांनी या योजनेत पैसे लाटल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने पडताळणी सुरू केली होती. या तपासणी दरम्यान अपात्र असून या योजनेत पैसे लागणाऱ्या कडून ते पुन्हा वसूल केले जात आहेत. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी या योजनेत आहेत. सदर बोगस लाभार्थ्यांकडून मिळालेले पैसे वापस घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दहाव्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार
सध्या सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत. परंतु दिवाळीच्या तोंडावर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली. त्यामुळे शेतकरी सध्या दहाव्या हप्ताचे पैसे कधी येणार याची वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत दहावा हप्ता जारी करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 15 डिसेंबरपर्यंत खात्यावर रक्कम मिळू शकते.
पती पत्नीच्या नावे योजनेचा हप्ता येत असेल तर होणारा अपात्र
पीएम किसान योजनेमध्ये कुटुंब हे गृहीत धरून प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीलाच लाभ मिळू शकतो. परंतु बऱ्याच ठिकाणी पती-पत्नी चे नावे देखील योजनेचा हप्ता मिळालेला आहे. त्यामुळे सदरील योजनेतून पती-पत्नी पैकी एक जणांचे नाव वगळून त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाणार आहे.