आयुष्यमान भारत योजना अंतर्गत पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार उपलब्ध झाले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवावे लागेल. हे आयुष्यमान कार्ड बनवणं आणखी सोपे झाले आहे.
आयुष्यमान कार्ड कसे बनवावे:-
आयुष्यमान भारत योजना अंतर्गत(pm-jay) पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवावे लागेल. हे आयुष्यमान कार्ड बनवणे आता आणखी सोपे झाले. खरंतर लाभार्थी utiitsl केंद्रावर पीएम जेवाय अंतर्गत त्यांचे ‘आयुष्मान कार्ड’ बनवून घेऊ शकतात.तसेच तुम्ही या योजनेसाठी आणि कार्ड साठी पात्र आहात की नाही हे तपासण्यासाठी जवळच्या utiitsl केंद्राला भेट देऊ शकता किंवा त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 14 555 वर कॉल करू शकता.
हे हि वाचा:-आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विम्याची रक्कम
आयुष्यमान भारत योजना साठी कोणतीही विशेष नोंदणी प्रक्रिया नाही. rjby योजनेअंतर्गत secc द्वारे ओळखला गेलेल्या सर्व लाभार्थ्यांना पीएम जेवाय लागू आहे. तुमची पात्रता तपासण्यासाठी पीएम जेवाय पोर्टलला भेट द्या आणि मी पात्र आहे का या ऑप्शन वर क्लिक करा.पुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर भरावा लागेल त्यानंतर कॅपच्या कोड आल्यानंतर तुम्हाला ओटीपी व(टाइम पासवर्ड) जनरेट करावा लागेल.पुढे आपले राज्य निवडल्यानंतर आपले पूर्ण नाव, एचडी क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक द्वारे तुमच्याबद्दलची माहिती शोधा शोध घेतल्यानंतर जी माहिती समोर येईल त्या आधारावर तुम्ही आणि तुमचे कुटुंब या योजनेत समाविष्ट आहे का नाही तुम्ही पाहू शकाल.

एकदा तुम्ही पी एम जे ए वाय चा लाभ मिळविण्यास पात्र झाला की तुम्ही योजनेशी संबंधित ई-कार्ड सहज मिळवू शकता. तुमच्या आधार किंवा रेशन कार्ड pmjay kiosk वर पडताळले जाईल त्यानंतर तुम्हाला आयुष्यमान कार्ड देण्यात येईल. या कार्ड चा लाभ घेण्यासाठी लाभार्थी ला आधार कार्ड किंवा कोणतीही शासकीय ओळखपत्र तसेच कौटुंबिक ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल.आयुष्यमान भारत योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणूनही ओळखली जाते आणि या योजनेचे उद्दिष्ट आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्यसेवा आणि सुविधा प्रदान करणे आहे. या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर 2018 रोजी केली होती.या आरोग्य विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील सुमारे 50 कोटी नागरिकांना संरक्षण देण्यात आले आहे.