SBI बँकेत नोकरीची संधी; असा करा अर्ज

sbi bank job job

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या एकूण 2056 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत

पदाचे नाव:-प्रोबेशनरी ऑफिसर.

शैक्षणिक पात्रता:-

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट ची पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा:-

दिनांक 1/4/ 2021 या तारखेनुसार 21 वर्षे ते 30 वर्षे.

कशी होणार निवड:-

पूर्व परीक्षा:-

या पदासाठी पूर्व परीक्षा असणार असून ती 100 मार्काची असणार आहे.या परीक्षेतील प्रश्न हे objective स्वरूपाचे असणार आहेत. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.

मुख्य परीक्षा:-

मुख्य परीक्षा ही तीन तासाची असणार असून 4 विषयांमध्ये मध्ये 200 मार्क साठी मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. मुख्य  परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार असून चार चुकीच्या मार्क मागे एक गुण कापला जाणार आहे.

job
job

तोंडी परीक्षा:

      मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांची तोंडी परीक्षा घेतली जाणार असून ती 50 मार्क ची आहे.या 50 मार्क मध्ये इंटरव्यू 30 मार्क आणि ग्रुप डिस्कशन 20 मार्क चे असणार आहे.

पगार:-पगार 36 हजार ते 63 हजार 840 रुपये असणार आहे.

अशा पद्धतीने करा अर्ज:-

या पद भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांना अर्ज करावयाचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://bank.sbi/web/careers या लिंकचा वापर करा.

अर्ज करण्याची तारीख:-सदरच्या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.

           जाहिरात पहाण्यासाठी येथे 

                     click  करा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *