स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या एकूण 2056 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
पदाचे नाव:-प्रोबेशनरी ऑफिसर.
शैक्षणिक पात्रता:-
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट ची पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा:-
दिनांक 1/4/ 2021 या तारखेनुसार 21 वर्षे ते 30 वर्षे.
कशी होणार निवड:-
पूर्व परीक्षा:-
या पदासाठी पूर्व परीक्षा असणार असून ती 100 मार्काची असणार आहे.या परीक्षेतील प्रश्न हे objective स्वरूपाचे असणार आहेत. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
मुख्य परीक्षा:-
मुख्य परीक्षा ही तीन तासाची असणार असून 4 विषयांमध्ये मध्ये 200 मार्क साठी मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. मुख्य परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार असून चार चुकीच्या मार्क मागे एक गुण कापला जाणार आहे.

तोंडी परीक्षा:
मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांची तोंडी परीक्षा घेतली जाणार असून ती 50 मार्क ची आहे.या 50 मार्क मध्ये इंटरव्यू 30 मार्क आणि ग्रुप डिस्कशन 20 मार्क चे असणार आहे.
पगार:-पगार 36 हजार ते 63 हजार 840 रुपये असणार आहे.
अशा पद्धतीने करा अर्ज:-
या पद भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांना अर्ज करावयाचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://bank.sbi/web/careers या लिंकचा वापर करा.
अर्ज करण्याची तारीख:-सदरच्या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.
जाहिरात पहाण्यासाठी येथे
⇒ click करा