देशभरात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. अनेक राज्यांमध्ये तापमानात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळतय. जम्मू- काश्मीरच्या अनेक भागांमध्ये तापमान शुन्य डिग्री सेल्सिअसच्या देखील खाली पोहोचलं आहे. तर काही भागात एक डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये दाट धुक्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभाग आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस देशातील अनेक भागात तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. मात्र त्यानंतर भारताच्या उत्तरेकडील राज्य, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.