Maharashtra Cabinet Decision : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर ; १५ जिल्ह्यांना मिळणार लाभ

काय आहे निर्णय

राज्य शासनामार्फत घोषित करण्यात आलेल्या “अतिवृष्टी” या नैसर्गिक आपत्तीकरिता देखील २४ तासामध्ये ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस हा निकष कायम ठेवून याबरोबरच सततच्या पावसाकरिता निश्चित करण्यात येणाऱ्या दुसऱ्या ट्रीगरमधील “सामान्यकृत वनस्पती निर्देशांक (NDVI)” हा अतिरिक्त निकष शेती पिकांच्या नुकसानीकरिता लागू करण्यात आला आहे. दुष्काळाव्यतिरिक्त इतर सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी देखील हा निकष लागू राहील

गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकाराने दि. १५ जुलै ते १५ ऑक्टोबर या कालावधीत महसूल मंडळामध्ये सलग पाच दिवसाच्या कालावधीत प्रत्येक दिवशी किमान १० मि.मी पाऊस झाल्यास महसूल मंडळातील बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करुन पंचनामा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अहमदनगर, अमरावती, अकोला, संभाजीनगर, बीड, बुलढाणा, जळगाव, जालना, नागपूर, नाशिक, धाराशिव, परभणी, वाशिम व सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास १५ लाख ५७ हजार ९७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते

Scroll to Top