तुमच्याकडे १ हेक्टर जमीन असेल, आणि तुम्हाला ३ लाख रूपये पिककर्ज घ्यायचं असेल, तर असं शक्य होत नाही, ते हेक्टरावर ठरवलं जातं, त्यातही त्या जमिनीवर काय पेरलं आहे, यावर असतं, कापूस असेल तर हेक्टरी 60 ते 65 हजार रूपये पिककर्ज दिलं जातं. फळबागांवरचा खर्च हा तुलनेने दुप्पट असल्याने फळबागांना हेक्टरावर 90 ते 110 हजारांपर्यंत पिककर्ज दिलं जातं. त्यातही ते कर्ज ३ लाखांच्या वर घेतल्या, व्याजदरात कोणतीही सूट दिली जात नाही.शेतात ऊस असल्यास हेक्टरी 90 ते 95 हजार रुपये पिक कर्ज मिळते.
ठिबक सिंचन, पाईपलाईन, विहिर खोदणे अशा कामांसाठी घेतलेलं कर्ज हे पिककर्ज म्हणून गणले जात नाही. या कर्जाचा व्याजदर प्रचलित नियमानुसार असतो, होमलोन एवढा, येथे कर्जाच्या व्याजदरात शेतकऱ्यांना सूट नसते. हे दीर्घ मुदतीचं कृषी कर्ज असतं.
वरील माहितीत थोडीफार तफावत असू शकते, मात्र ढोबळमानाने देण्यात आलेली ही माहिती अशा लोकांसाठी आहे, ज्यांना वाटतं की पिककर्ज म्हणजे शेतकऱ्यांना वारेमाप मिळतं, कोणतेही नियम नसावेत, आम्ही टॅक्स भरतो, आमचा पैसा शेती क्षेत्रावर खर्च होतो, असे गैरसमज करणाऱ्यांसाठी ही माहिती आहे. मात्र शेती क्षेत्रावर दिलं जाणारं कर्ज, मोठ्या प्रमाणात बँकिंग क्षेत्राला व्याजही मिळवून देतं.