२) इन्स्टंट ई-पॅन E-Pan Card download
पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी पैन कार्ड धारक आयकर विभागाच्या ऑनलाइन सुविधेचा वापर करून इन्स्टंट ई-पॅन किंवा त्यांच्या पॅन कार्डची डिजिटल व्हर्जन डाउनलोड करू शकतात. संपूर्ण प्रक्रिया सोपी आहे आणि त्यासाठी फक्त तुमचा आधार क्रमांक आवश्यक आहे आणि त्यासाठी अवघे 10 मिनिटे लागतात.
- आयकर ई-फायलिंगच्या https://www.incometax.gov.in. या अधिकृत वेबसाइट वर जा.
- ‘आमच्या सेवा’ विभागात, ‘इन्स्टंट ई-पॅन’ पर्यायावर .
- जर तुम्ही आधी ई-पॅन डाऊनलोड केले असेल तर ‘चेक स्टेटस/ डाऊनलोड ई-पॅन’ पर्यायावर , परंतु जर तुम्ही यापूर्वी कधीही ई-पॅन डाउनलोड केले नसेल तर तुम्हाला ‘नवीन ई-पॅन’ पर्यायावर वे लागेल.
- तुम्हाला तुमच्या गरजेनुसार दिलेल्या पर्यायांमधून ठराविक प्रयाय निवडावे लागतील आणि नंतर सुरू ठेवा वर वे लागेल.
- आता जे पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकण्यास सांगितले जाईल. त्यामुळे इनपुट फील्डमध्ये तुमचा आधार क्रमांक टाका.
- तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकताच पेजवर एक डिक्लेरेशन डिस्प्ले दिसेल, तुम्हाला सुरू ठेवा वर वे लागेल.
- यानंतर तुमच्या नोंदणीकृत किंवा आधार लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल.
- यानंतर, दिलेल्या फील्डमध्ये तुमच्या मोबाईलवर मिळालेला ओटीपी एंटर करा.
- तुमचे सर्व तपशील या पेजवर दिसतील. सर्व माहिती काळजीपूर्वक तपासल्यानंतर तुमचा ईमेल टाका.
- लवकरच तुम्हाला तुमचा ई-पॅन तुमच्या ईमेल इनबॉक्समध्ये मिळेल. तुम्ही तुमचे ई-पॅन प्रिंट देखील करू शकता.
- जर तुमचा पॅन नंबर असेल तर तुम्ही तुमचे मूळ पॅन कार्ड कोठे तयार केले होते यावर अवलंबून UTIITSL किंवा TIN-NSDL च्या वेबसाईटवरून तुमचा ई-पॅन डाउनलोड करू शकता.