भाड्याने शेतजमीन घेतल्यावरच्या अटी

भाड्याने शेतजमीन घेतल्यावरच्या अटी

  • शेतात लागवड होणाऱ्या पिकासंदर्भातील माहिती महामंडळाला देणे बंधनकारक असते. दहा वर्षांपेक्षा जास्त काळ चालणारे पिके घेण्यास बंदी असते.
  • संबंधित जमिनीवर आपल्याला घर, बंगला, शेड किंवा कायमस्वरूपाचे कोणतेही बांधकाम करता येत नाही. या जमिनीवर फक्त पिकांची लागवड करता येते.
  • कोणताही व्यवसाय, प्रक्रिया उद्योग करण्यास मनाई असते. संबंधित क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी शासनाचे अधिकारी असतात. शेतीच्या सुरक्षेसाठी सरकारचे सुरक्षारक्षकही काम करतात त्यामुळे अतिक्रमण होत नाही.
  • जमीन भाड्याने घेतल्यानंतर शेतकरी त्या जमिनीमध्ये पाण्याच्या व्यवस्थेसाठी शेततळे, बोअरवेल, विहीर खोदू शकतात. शेती पिकांमधून अपेक्षित उत्पन्न मिळावे हा त्यामागील हेतू असतो.