land record:आता गुंठा-गुंठा तुकडे करून जमीन विक्री करणे शक्य पहा जमीन खरेदी विक्रीचे नवीन नियम

Land For Sale new Rules

तर मग ही अशी तुकडेबंदी महाराष्ट्रात लागू होती.

land record:असं असतानाही अगदी एक, दोन, तीन गुंठे असे जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत होते आणि त्याची दस्त नोंदणीही होत होती. मग याला आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलली. त्यानुसार मुद्रांक शुल्क विभागाने राज्यातील जिल्हा दुय्यम निबंधकाना तीन सूचना दिल्या होत्या.land record

पहिली सूचना –

एखाद्या सर्व्हे नंबरचे (गट नंबर) क्षेत्र दोन एकर आहे. त्याच सर्व्हे नंबरमधील तुम्ही एक, दोन अथवा तीन गुंठे जागा विकत घेणार असाल, तर त्याची दस्त नोंदणी होणार नाही.

म्हणजेच विकत एक, दोन अथवा तीन गुंठे जमीन तुम्ही विकत घेणार असाल तर ती तुमच्या नावे होणार नाही.

मात्र, त्याच सर्व्हे नंबरचा ‘ले-आउट’ करून त्यामध्ये एक, दोन गुंठयांचे तुकडे पाडून त्यास जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल,  तर अशा मंजुरी घेतलेल्या ले-आउट’ मधील एक, दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकणार आहे.land record

दुसरी सूचना 

यापुर्वीच ज्याने  प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकडयाची खरेदी घेतली असेल, अशा तुकडयाच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी सुध्दा सक्षम प्राधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे.

तिसरी सूचना 

एखाद्या तुकडयाची शासन भुमी अभिलेख विभागामार्फत याआधीच हददी निश्चित होऊन किंवा मोजणी होवून त्याचा स्वतंत्र हदद निश्चितीचा मोजणी नकाशा देण्यात आला असेल अशा तुकड्याची विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही. मात्र त्याचवेळी अशा स्वतंत्रपणे निर्माण झालेल्या तुकड्याच्या विभाजनास वरील अटी व शर्ती लागू रहातील.

आता मात्र या सर्व अटी उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्या आहेत.

त्यामुळं आता राज्य सरकार पुन्हा कोणता कायदा आणतं की न्यायालयाचा निर्णय आहे तसा मान्य करतं हे येणाऱ्या काळातच कळेल.  बाकी जगू तात्याची कॉलर आता पुन्हा टाइट होईल हा भाग वेगळा.land record