पण या सगळ्यात एक मुद्दा समोर आला तो म्हणजे सर्वाधिक जमीन असलेला शेतकरी. तुम्हाला माहिती आहे का भारतात सर्वात जास्त जमीन कोणाची आहे? सर्वात मोठा ‘जमीनदार’ कोण आहे?
याचे थेट उत्तर आहे भारत सरकार आहे. गव्हर्नमेंट लँड इन्फॉर्मेशन सिस्टम (GLIS) च्या वेबसाइटवर दिलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2021 पर्यंत, भारत सरकार सुमारे 15,531 चौरस किलोमीटर जमिनीचे मालक होते. ही जमीन 51 मंत्रालये आणि 116 सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडे आहे.