गावठाण

गावठाणा (LAND RECORD) पासून 200 मीटरच्या आत समाविष्ट गटाच्या जमीन मालकांना आता बिनशेती परवानगीची अर्थात एनए (NA) ची गरज राहणार नाही. शासनाने 13 एप्रिल 2022 रोजी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशामुळे अशा जमीन मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.