शेतामध्ये गाळ टाकण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 37500/-रुपये अनुदान अनुदानासाठी येथे करा अर्ज

निवड प्रक्रिया (यादी तयार करणे) :-
१) गाळ घेऊन गेलेले सीमांत / अत्यअल्पभूधारक (१ हेक्टर पर्यंत) व लहान (१ ते २ हेक्टर) शेतकन्यांची यादी तयार करण्यात येतील. २) शिवाय विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकरी अनुदानास (सबसीडी) पात्र राहतील. सदर लोक बहूभूधारक असले तरी अनुदानास पात्र राहतील.
शेतक-यांना अनुदानाची मर्यादा:-
पसरविण्यात आलेल्या गाळाच्या रु.३५.७५/ प्रति घनमीटर प्रमाणे एकरी रु.१५,०००/- च्या मर्यादित म्हणजेच एकरामध्ये ४०० घनमीटर गाळाच्या मर्यादित अनुदान देण्यात येईल. हे अनुदान फक्त अडीच एकर पर्यंत म्हणजेच रु.३७,५००/- अधिकाधिक देय राहील. विधवा, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतक- यांना सुध्दा ही मर्यादा लागू राहील.
या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा
गावात “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” अंतर्गत काम सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन अशासकीय संस्थांनी जिल्हा स्तरीय समितीस प्रस्ताव सादर करावा. त्यात जलसाठ्यामध्ये अंदाजे उपलब्ध गाळाचा प्रमाणाचा उल्लेख असणे बंधनकारक असेल.
Scroll to Top