या पिकांना मिळणार एवढे पीक कर्ज

मुख्य पिकांना अधिकची रक्कम

सध्या शेतकरी शेतीची मशागत करत आहे. पण याच काळात शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज भासत असते. पिक कर्ज मिळविण्याची प्रक्रिया काही शेतकऱ्यांना फार अवघड वाटते. मात्र शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून उत्पादनात वाढ व्हावी या मागचा उद्देश आहे. सोयाबीन खरिपातील मुख्य पीक आहे त्यामुळे अधिकच शेतकरा नंबर याच पिकावर असतो त्यामुळे सोयाबीनला यंदा हेक्‍टरी 53 हजार 900 रुपये ठरवून देण्यात आले आहेत. सोयाबीन नंतर कापूस हे देखील एक मुख्य नगदी पीक आहे तर कापसाला या वर्षी हेक्टरी 73 हजार 800 रुपये ठरवून देण्यात आले आहेत.

तसेच उसासारख्या नगदी पिकासाठी 1 लाख 38 हजार रुपये कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आहे. हळदीसाठी 71 हजार 500 रुपये हेक्टरी. आद्रकिसाठी (आले) साठी हेक्टरी 55 हजार 300 रुपये कर्ज मिळणार आहे.