आयकर विभागाचा नियम काय सांगतो

आयकर विभागाचा नियम काय सांगतो

आयकर विभागाने घरात कॅश ठेवण्याबाबत कोणताही नियम तयार केलेला नाही. म्हणजेच तुम्ही घरात कितीही कॅश ठेवू शकणार आहात. यासाठी Income Tax विभागाने कोणतेच निर्बंध लावलेली नाहीत. भारतीय आयकर विभागाच्या नियमांनुसार, तुम्ही तुमच्या घरात कितीही रोकड ठेवू शकता, परंतु जर ती तपास यंत्रणेने पकडली तर तुम्हाला त्याचा स्रोत सांगावा लागेल.

जर तुम्ही ते पैसे कायदेशीररित्या कमावले असतील आणि त्याबाबतचे सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील किंवा आयकर रिटर्न भरले असतील, तर तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही. परंतु जर तुम्ही स्त्रोत सांगू शकत नसाल तर एजन्सी नक्कीच तुमच्यावर कारवाई करणार आहे. जर तुम्ही रोख रकमेचा हिशेब ठेवला नाही तर तुमच्या समस्या मात्र वाढू शकतात.

जर तुमच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली. आणि तुम्ही त्या रोख पैशांची योग्य माहिती देऊ शकला नाहीत तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार आहे. आयकर कायद्यानुसार, तुमच्याकडून वसूल केलेल्या रोख रकमेच्या 137% पर्यंत कर आकारला जाऊ शकतो.

म्हणजे तुमच्याकडे असलेली सर्व कॅश तर जमा होईलच शिवाय वरून तुम्हाला ३७ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. त्यामुळे घरात कितीही कॅश ठेवली तरी प्रॉब्लेम येत नाही मात्र त्या कॅशचे स्रोत तुम्हाला सांगता आले पाहिजेत. त्याबाबतचे कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तुम्ही जर योग्य मार्गाने कॅश कमावलेली असेल आणि तुमच्याकडे त्याबाबतची सर्व कागदपत्रे असतील तर तुम्ही घरात करोडो रुपये ठेवू शकता.