व्यवहार न केल्यास खाते किती दिवसांत बंद होते
अलीकडच्या काही महिन्यांत खात्यातून कोणताही व्यवहार केला नाही ज्यामुळे खाते ‘इनऑपरेटिव्ह’ आहे किंवा बंद झाले असल्याची अनेक ग्राहक बँकेकडे तक्रार करतात. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तुमचे कोणत्याही बँकेत खाते आहे आणि काही कारणास्तव तुम्ही दोन वर्षांहून अधिक काळ व्यवहार करत नसाल तर तुमचे खाते बँकेद्वारे निष्क्रिय केले जाते. खाते निष्क्रिय केल्यानंतर तुम्ही खात्यातून कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू शकणार नाही. मात्र, लक्षात घ्या की निष्क्रिय खात्यात जमा रक्कम तशीच राहील आणि कालांतराने बँक त्यावर नियमित व्याज देत राहील.
News with knowledge