Board Exams Updates: दहावी आणि बारावीच्या परीक्षाही आता सहामायी आणि वार्षिक म्हणजेच सेमिस्टर पॅटर्नमध्ये घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे, आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
MSRTC Recruitment 2024: एस. टी. महामंडळात मोठी भरती; पात्रता 10 वी पास, जाणून घ्या पदे आणि वेतन
New Exam Pattern For 10th and 12th : लवकरच इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पॅटर्नमध्ये मोठे बदल होणार आहेत. नव्या परीक्षा पॅटर्ननुसार, दिवाळीआधी एक सत्र, मार्चमध्ये दुसरे सत्र आणि अंतिम सत्र पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची वर्षातून दोनदा परीक्षा होणार आहे. त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांप्रमाणे सहामायी आणि वार्षिक पद्धतीने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. या नवीन पद्धतीची अंमलबजावणी २०२४-२५ किंवा २०२५-२६ अशा शैक्षणिक वर्षांमध्ये करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे.Board Exams Updates
दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे या परीक्षांची विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठी चिंता असते. अनेकदा बोर्डाची परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. तर अनेक विद्यार्थी शिक्षण अर्ध्यावर सोडून देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळण्याची गरज असते. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
Board Exams Updates
सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि त्यांच्यावरील ताण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या सहा महिन्यातच पुन्हा संधी मिळेल आणि त्यामुळे अर्धवट शिक्षण सोडणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. यासोबत एका सत्रात कमी गुण मिळाल्यास दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना जास्त अभ्यास करण्याची संधी असणार आहे. यासोबतच नवीन अभ्यासक्रमात पुस्तकांमधील मजकूर देखील कमी करून तो मनोरंजक आणि समर्पक बनवण्यात येणार आहे.
पुस्तकांच्या आशयाची सांगड घातली जाणार असून, विद्यार्थ्यांसाठी सामग्री लक्षात ठेवण्याऐवजी, ती वैचारिक बनविण्याचाही अभ्यासक्रमातून प्रयत्न होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले.
karjmafi 2023 :-कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर,गावानुसार याद्या पहा
मात्र शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच शिकवतील. पण, पदवी, पदव्युत्तर पदवीच्या परीक्षांप्रमाणे दहावी- बारावीच्या परीक्षाही सत्र पद्धतीने होणार आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पहिले सत्र दिवाळीपूर्वी तर पुढील सत्र मार्च महिन्यात होईल. पण त्यापूर्वी विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पार पडणार आहे. त्यानंतर शैक्षणिक वर्षाच्या शेवटी दोन्ही सत्र परीक्षांचे गुण एकत्रित करून बोर्डाच्या माध्यमातून निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. यावेळी, पहिल्या सत्राचे गुण विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहेत.