Cotton Rate:Cotton Production : कापसाचा नवा हंगाम तोंडावर आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाना आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाची आवक सुरु झाली.
नव्या कापसाला मिळतोय “तब्बल” इतका भाव

येथे क्लिक करून पहा
कापसाचा नवा हंगाम तोंडावर आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाना आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाची आवक सुरु झाली. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही नव्या कपसाच्या लिलावाचा शुभारंभ झाला. पण खरी आवक सुरु झाली ती पंजाब, हरियाना आणि राजस्थानमध्ये.
Gram Panchayat Yojana: तुमच्या गावातील ग्रामपंचायत योजनांच्या यादीत नाव पहा मोबाइलवर
या तीन्ही राज्यांमध्ये हमीभावापेक्षा जास्त भावाने कापसाचे व्यवहार पार पडत आहेत. सुरुवातीलाच हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने हंगाम जोमात सुरु झाल्यानंतरही हा भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे.
कापूस बाजाराला आधार देणारा महत्वाचा घटक म्हणजे जागतिक कापूस उत्पादनात घटीचा अंदाज. अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने मागील तीन महिन्यांमध्ये सतत जागतिक कापूस उत्पादन, अमेरिका आणि भारताच्या कापूस उत्पादनात घटीचा अंदाज दिला. सप्टेंबरच्या अहवालातही मागील महिन्यातील अंदाजापेक्षा कमी उत्पादन राहील, असे म्हटले आहे.Cotton Rate
ताज्या अहवालात अमेरिकेच्या कृषी विभागाने जागतिक कापूस उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ६ टक्क्यांनी घटेल असे म्हटले आहे. तर ऑगस्ट महिन्यातील अंदाजाच्या तुलनेत सप्टेंबरमधील अंदाजात अमेरिका आणि भारतातील उत्पादन आणखी कमी होईल, असा अंदाज दिला. आता जागतिक कापूस उत्पादनात भारत दुसऱ्या तर चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण या दोन्ही देशांमधील उत्पादन अंदाजात सातत्याने घट केली जात आहे.
दुसरं कारण म्हणजे देशातील दुष्काळी स्थिती. यंदा महत्वाच्या कापूस उत्पादन राज्यांमध्ये पावसाने दडी दिली. त्यातच देशातील कापूस लागवड यंदा सव्वातीन टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळे सहाजिकच देशातील कापूस उत्पादन कमी राहील, असा अंदाज आहे. देशात किती कापूस उत्पादन होईल याबाबत देशातील उद्योग संघटनांनी अद्याप अंदाज दिला नाही.
पण अमेरिकेच्या कृषी विभागाने अंदाज दिला. पण युएसडीएने मागील दोन महिन्यांमध्ये भारतातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी केला. मागील महिन्यातील अंदाजात ३२६ लाख गाठी कापूस उत्पादन होईल, असे म्हटले होते. पण चूल महिन्यातील अंदाज ३२० लाख गाठींपर्यंत कमी करण्यात आला. याच युएसडीएनं मागील खरिपातील उत्पादन ३३२ लाख गाठींवर स्थिरावलं होतं, असं सांगितलं.
कापूस बाजाराला आधार देणारं तिसरं कारण म्हणजे, पिकाचं होत असलेलं नुकसान. मध्य भारत आणि दक्षिण भारतात दुष्काळी स्थितीमुळे उत्पादकता घटत आहे. तर उत्तर भारतासह देशभरात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या बातम्या येत आहेत.
सध्या गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचं प्रमाण कमी असलं तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पंजाब, हरियाना आणि राजस्थान या राज्यांमध्ये ही समस्या जास्त आहे. याच तीन कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव तेजीत आहेत. तर देशातही वायद्यांमध्ये कापसाला चांगला भाव मिळतोय.