Businessmsrtc update:महिलांना अर्ध्या तिकिटावर बस प्रवास निर्णयामध्ये मोठा बदल; आता फक्त “या” वयोगटातील महिलांना मिळणार योजनेचा लाभ admin3 years ago3 years ago01 mins mins msrtc update msrtc update:राज्य सरकाने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. एसटी महामंडळाच्या सर्व बसमधून महिलांना अर्ध्या तिकिटावर राज्यात कोठेही प्रवास करता येणार आहे. मात्र, राज्य सरकारने महिलांसाठी जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी तारीख अद्याप निच्छित झाली नाहीय. दरम्यान, राज्य सरकाने घेतलेला निर्णय हा बससाठी आणि महिलांसाठी योग्य असून तसे परिपत्रक रीतसर आल्यानंतर सर्व महिलांना लाभ देण्यात येईल, अशी माहिती जळगावचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली आहे.msrtc update महिलांना अर्ध्या तिकिटावर बस प्रवास निर्णयामध्ये मोठा बदल; आता फक्त “या” वयोगटातील महिलांना मिळणार योजनेचा लाभ योजनेमुळे सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम राज्य सरकार महामंडळाला मिळेल. त्यातून उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक अडचणीतील लालपरीला नवसंजीवनी मिळणार आहे. एसटी महामंडळातर्फे समाजातील विविध ३० घटकांना प्रवास भाड्यात ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. आता राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत सुमारे ६ कोटी ज्येष्ठ प्रवाशांनी घेतला आहे.msrtc update सध्या दररोज सरासरी ५ लाखापेक्षा जास्त अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक एसटीतून मोफत प्रवास करतात. दरमहा ६५ ते ७० कोटी रुपये मिळतात. सध्या एसटीतून दररोज ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करतात आणि विविध योजनांमुळे महामंडळाला दिवसाला (प्रतिपूर्ती रक्कमेसह) २२ ते २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. त्यातून अडचणीतील लालपरीचा प्रवास सुरू आहे. आता राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार परिपत्रक निघाल्यानंतर महिलांना प्रवास दरात ५० टक्क्यांची सवलत लागू होईल. त्याचाही मोठा आधार लालपरीला मिळणार आहे.msrtc free pass लालपरीची सद्यःस्थिती सध्या दररोज सरासरी ५०-५५ लाख प्रवासी करतात लालपरीतून प्रवास., एकूण प्रवाशांमध्ये अंदाजे ३० टक्के म्हणजेच १६ ते १७ लाख महिला प्रवासी., १२ वर्षाखालील मुलींना आणि ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ महिलांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत., राज्यातील ७५ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना प्रवासात १०० टक्के सवलत., महामंडळाचा दरमहा सरासरी खर्च ८५० कोटी व उत्पन्न ७२० कोटींपर्यंत आहे. नोकरदार व माहेरवासिनींना लालपरीचा आधार msrtc update एसटीने प्रवास न करणाऱ्या महिला सध्या पर्यायी वाहनांचा वापर करतात. अनेक नोकरदार स्त्रिया स्वतःची दुचाकी अथवा चारचाकी घेऊन ये-जा करतात. काही महिला वडाप, ॲटोरिक्षातून जातात. तर अनेकजण कुटुंबासोबत खासगी वाहनाचा वापर करतात. त्या महिला आता एसटीकडून ५० टक्के सवलत मिळणार असल्याने लालपरीतून प्रवास करतील. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला भरघोस उत्पन्न मिळेल आणि अडचणीतील लालपरीची स्थिती सुधारेल, असा विश्वास महामंडळाला आहे. Post navigation Previous: farmers pipline scheme:शेतीच्या पाइप लाईन साठी मिळणार 70%अनुदान;असा करा अर्जNext: gharkul yadi:ग्रामपंचायत घरकुल मंजूर यादी 2023-24 डाउनलोड करा मोबाईल मध्ये Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
HSC & SSC Result HSC & SSC Result: 10 वी 12 वी चा निकाल “या” तारखेला लागणार,येथे पहा कधी लागणार निकाल admin1 year ago 0
Tata Nano EV 2024 Tata Nano EV 2024:आता फक्त 1 लाख रुपये मध्ये येणार TATA NANO इलेक्ट्रिक कार, 315 किलोमीटर अवरेज सह admin1 year ago1 year ago 0
PM-KISAN Yojana 2024 PM किसान योजनेचा 16 वा हप्ता “या” तारखेला बँक खात्यात जमा होणार admin1 year ago 0
gharkul yojana 2024 gharkul yojana 2024:आपल्या गावची 2023-2024 ची सर्व योजनांची घरकुल यादी पहा आपल्या मोबाईलवर admin1 year ago 0