गव्हाच्या पेरणीच्या अगोदर ठरले भाव ; औरंगाबाद मध्ये नवीन उपक्रम
शेतातला माल बाजारपेठेत दाखल होईपर्यंत त्याचा दर शेतकऱ्यांना ठरवता येत नाही. मग पेरणी झाली की, दर कसा ठरला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा भन्नाट उपक्रम असाच आहे. होय ‘उत्पादक ते ग्राहक’ या तत्वावर जिल्ह्यातील सेंद्रिय गहू उत्पादक शेतकरी व ग्राहक म्हणून जिल्हा परिषदेत काम करणारे अधिकारी-कर्मचारी हे राहणार आहेत….