आदिवासी विभागाच्या माध्यमातून बचत गटासाठी महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात त्याच्यामधील एक योजना म्हणजे कुक्कुटपालन. या योजनेअंतर्गत आदिवासी बचत गटांना शेड बांधकामासाठी त्याचप्रमाणे छोटी पक्षी खरेदी करण्यासाठी पशुखाद्य खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारे अनुदान यांच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी अनुदान दिले जाते. योजनेचा अर्ज सुरू झाले असून आणि आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी 5.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या योजनेसाठी दिले जाते. आदिवासी विभाग ठाणे लोककल्याणासाठी काम करत असून त्या अनुषंगाने आदिवासी पाड्यात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी एकात्मिक कुक्कुट पालन योजना महत्त्वपूर्ण असणार आहे याचा जास्तीत जास्त आदिवासी बचत गटाने या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी आज केले आहे